पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रफुल्ल

प्रफुल्ल


हरितवस्त्रांकिता विनटली

सुंदर ही अवनी,

हरितछटा त्या मनास जाती

नित्य नित्य मोहुनी!


सुंदरसुंदर जरतारी हा

शालु पर्णांचा,

वेलबुट्टी ती मधेच रेखी

रविकिरणांचा ढाचा।


प्रफुल्लीत ती जणु कामिनी

नटुनी पहा आली,

दर्शन देता भास्कर गगनी

गाली खुलली लाली।


उदास मन ते पुलकित झाले

रविकर नभी आला,

मौज लुटुया अवघे त्याची

सूर्योदय जगी झाला।


©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू