पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाऊस कविता

पाऊस कविता .... 

~~~~~~~~~



चेह-यावरती हसू पसरले,

आज अचानक मेघ बरसले.

झाडे, वेली, गवत नि माती, 

पावसात या सचैल न्हाती. 

मृदगंधाला  घेऊन  आली,

माती सुध्दा गंधित  झाली. 

कुणास आठवण येई चहाची,

कुणास आठवण मग कणसाची. 

कुणास वाटे चिंब भिजावे, 

सर्दी  होता  काढे  प्यावे. 

छत्री उघडू म्हणता म्हणता, 

अशीच सुचली पाऊस कविता. 



दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर (गुजरात)

मोबाईल  :  9723717047. 




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू