पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी मलाच भेट

माझी मलाच भेट….
………………………

आपल्या कुटुंबा बरोबर संसार करतानां सर्व बायका आनंदी असतात . आपल्या बाळाला मोठं करण्यातच आईला परम आनंद वाटतो . बाळाची प्रत्येक क्रीडा मनमोहक असते. जगातलं सर्वात सुंदर नातं आई आणि तिच्या बाळाचं असतं . निःस्वार्थ
प्रेम , निःस्वार्थ भावना आणि निःस्वार्थ मन . हे सर्व करतांना मागे काही सुटत आहे असं लेश मात्र ही वाटत नाहीं .

आज सुरेखा जरा जास्तच कामात होती.
तिची लाडकी लेक अर्णिमा पूर्ण शिष्यवृत्ति मिळवून पुढील शिक्षणा साठी अमेरिकेला निघणार होती . तिच्या तयारीत सुरेखा गुंतली होती .

अरू झाली न बाळा सर्व तयारी !! तिकडे़ खूप सांभाळून रहा , कुणाशी वाद घालू नको , तिकडच्या लोकांशी सांभाळून रहा . अभ्यासा कड़े लक्ष घाल .

हो आई !!! किती वेळा सूचना झाल्या मला सर्व लक्षात आहे तू काळजी करू नको मी खूप सांभाळून राहीन असं म्हणत अरु माझ्या गळ्यात पड़ली. मी स्वता:चे अश्रुनां अवर घातली तिला घट्ट मिठीत धरलं. तिने लगेच माझ्या गाला वर गोड़ पापी दिली आणि लगेच वळून सामान उचलुन बाहेर निघाली.

‘ चला पप्पा गाडीत सामान ठेऊ.'
वडिलांच्या गळ्यात पडून अरु म्हणाली ..
चला बेटा वेळ झाली निघूया , तू सर्व व्यवस्थित करणार मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे . म्हणत दोघ बाहेर निघाले ..

सुरेखा अर्णिमाला बोलली , 'अरु तुला भरपूर खायचं सामान दिल आहे विसरू नको . तुला १५ दिवस तरी पुरेल .'

'ओ. के. आई . चला आता फ्लाइटची वेळ झाली
निघु या का ?'

अरू ला सोडून घरी आलो , घरात पाय ठेवायची इच्छा होत नव्हती . पण काही इलाज नव्हता . घरात शिरल्यावर सरळ डोळे बंद करून आराम खुर्चीत बसले .
थोड्या वेळ तशीच शांत बसून राहिले . डोळे उघडून खिडकितून बाहेर बघताना अश्रु अनावर झाले . थोडी शांत झाले .आपले स्वप्न आपल्या मुलीने पूर्ण केले अजून काय हवं असा विचार करून स्वःताच आपली समजूत काढली .
लहान असतांना माझा सावळा रंग हे मोठे
डिसक्वालिफिकेशन होते . आईला लोक सतत् लेकीला कसं गोर करायचं हे सल्ले द्यायचे . कुणीतरी तर गोरं होण्याचे क्रीम पण गिफ्ट केल . फक्त आईला वाटायचं की आपली मुलगी सुरेख आहे . नाकी डोळी माझ्या मुलीचे किती सुंदर आहे कुणालाच दिसत नाही . अस आईला वाटायचं . माझे नाव सुरेखा ठेवलं . मला नावाची सुद्धा लाज वाटायची . मनांत ही गोष्ट घर करून बसली की आपण वाइट दिसतो . मग ठरवलं जाऊद्या आपण अभ्यासात लक्ष लाऊ छानशी नोकरी करु .असा विचार करून अभ्यासात लक्ष घातले .

मनापासून अभ्यासाला लागले . तेव्हांच वडिलांच्या जुन्या मित्रानी आपल्या देखण्या मुलासाठी जो सरकारी नोकरीत मोठ्या पदावर होता ,माझी मागणी घातली . आई - वडील तर खूप आनंदात होते तरी त्यांनी सर्वस्वी निर्णय माझ्या वर सोडला . मला असं वाटले की या मुलानी आपणांस स्वताहून विचारल आहे ही मोठी गोष्ट आहे . आपण स्वःताला खूपच कमी लेखलं .खूप विचार करून मी लग्नाला होकार दिला .

अभ्यास मध्येच सुटला . नोकरी करण्याचे स्वप्न कधीच विसरले . सर्व लक्ष आता फक्त माझ्या संसारा कडे लावलं दोघी मुलींना मोठं करण्यात मी पूर्णपणे गुंतले .. ते मात्र मी नक्की ठरवलं की मुली माझ्या नक्कीच नोकरी करतील . त्याच वाटचालीत मुली चांगल शिक्षण घेऊन नोकरीत रुजु झाल्याच पाहिजे तसं ठरवल .

आता मोठी मुलगी मोठ्या पदावर नोकरी करते तर दूसरी उच्च शिक्षण घेणार नंतर ती ही उच्च पद प्राप्त करणार ..सर्व काही मना सारखं घड़लं. असे विचार मनात आले मग मनाला शांत वाटलं .

दिवस पुढे़ सरकत होते रोज़ मुलींशी फ़ोन वर गप्पा मारायच्या . दिवसा कामात स्वताला गुंतवून ठेवायचं . थोड वाचन ,थोडा टी . व्ही . , सकाळ - संध्याकाळ वॅाक असं मजेचे जीवन चालू होतं .

अचानक मला माझी मैत्रिण शुभदा एका मॅाल मधे भेटली .
‘अगं तू सुरेखा ना ’ तिनी मला विचारले ..

हो..तू शुभदा बरोबर ना .. इथे कधी पासून आहेस ?

'मी दोन महिन्या पूर्वी इकडे आले .इथे एका दैनिक वर्तमान पत्रा साठी काम करते ..तुझं हल्ली काय चालले आहे ? तू इथे कधी पासून आहे ?'

'माझे काही नाही मी घरीच असते . तू ये ना घरी शुभदा मी इथे जवळच राहते . आम्ही इकडे २० वर्षान पासून आहे ..'

'हो मी नक्की येइन तुझा फोन नंबर दे ना ..'

आम्ही एकमेकांचे नंबर घेतले लवकरच भेटू म्हणून घरी निघालो .

आमच्या भेटी आता सहज़ होऊ लागल्या एकमेकीन सोबत छान वेळ जात होता . तरी शुभदाचा नोकरी चा वेळ १० ते ५ असल्याने मी थोडी कंटाळायचे . माझे मिस्टर ही त्याच वेळी नोकरी वर जायचे त्यामुळे मला वेळ जाण कठिण व्हायचं .
एक दिवशी मी शुभदाला सहज म्हणाले, 'अगं दुपारी कंटाळा येतो मला वेळ जात नाहीं ..'

'अगं तू आमच्या पेपर साठी काही तरी लिहून काढना तू पुर्वी छान लिहित होती .'

'काय शुभदा मी काय लिहिणार , २५ वर्षात मी काही लिहिले नाही आता मला नाही जमायचं .'

'सुरेखा तू प्रयत्न कर एखादी गोष्ट लिहून काढ किंवा लेख लिहून काढ तुला नक्की जमेल . तू आज पासूनच सुरु कर .'

'नाहीं शुभदा मला लिहिता येण शक्य नाही तू उगाच मागे लागू नको .'

'सुरेखा मी सांगते ना म्हणून प्रयत्न तर कर नाही जमलं तर बघु मग !!'

'तू म्हणतेस तर प्रयत्न करून बघते , जमेल तसं वाटत नाही …'

‘ नक्की जमेल सुरेखा मला खात्री आहे ‘

एक लघु कथा लिहिण्यास सुरुवात केली , १० वेळा खोडली शेवटी अठोड्या भरात पूर्ण झाली . शुभदानी वाचली तिला आवडली . थोडे फार सुधार करून तिने गोष्ट आपल्या पेपर ला दिली . १५ दिवसानी सकाळी सकाळी शुभदा चा फोन आला , 'सुरेखा तुझी गोष्ट पेपरला छापून आली .'

'काय म्हणते शुभदा !!!! मला विश्वास बसत नाही'

'खरं सांगते तू पेपर बघ मी संध्याकाळी येते तुझ्या कडे !! बाय. …'
लगेच पेपर उघडला . गोष्ट पुन्हा पुन्हा वाचली . निखळ आनंद झाला . घरात सर्वांना सांगितलं .मुलिंना फोन केला . पूर्ण दिवस मन प्रसन्न
होतं . सर्वांनी उत्साह वर्धन केलं . विशेष म्हणजे शुभदा खूप खुश होती . मला शुभदा सारखी मैत्रिण भेटली ह्याचा मला आनंद आणि गर्व दोन्ही वाटत होता .

त्या पुढे माझ लिहिण्यात मन लागलं , वेळ मिळाला की काही तरी लिहित बसायचं . ४-६ गोष्टी एक दोन कविता लिहिल्या . मला खूप मोठी करमणुक मिळाली . माझ लिखाण काही दर्जेदार नसल तरी माझ्या साठी हे जास्त महत्वाची गोष्ट होती की मला नवीन उद्योग मिळाला . हळु हळु भाषा सुधारेल , शब्द रचना सुधारेल अशी माझी खात्री होती .

माझ्या व्यक्तिमत्वा ला नवीन स्वातंत्र्य , नवीन विश्वास , नव चेतना मिळाली हे माझ्या साठी जास्त महत्वाचे आहे . मला व्यक्त होण्याची स्वतंत्रता मिळाली . मनांतले लिहून काढले की मन कसं हलकं - हलकं वाटते , ही भावना कळली . स्वत: साठी काही तरी करीत आहे हे खूप भारी वाटत होतं . हीच माझ्या व्यक्तिमत्वाची स्वतंत्रता आहे . छोटी शी असली तरी माझ्यासाठी लय भारी आहे .

“ माझी मी नव्याने मलाच भेटले “ ….

सुनिता डगांवकर
देवास

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू