पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सर्जा राजा

   सर्जा राजा 

गाई गुराच्या गोठ्यात

उभी दौलत लाखाची

अशी मायेन जपली 

जोडी सर्जा अन राजाची_1

 

राती उपाशी काढल्या

किती किती रं गोठ्यात

दुःख घेतलं वाटून

एकमेकाच्या वाट्यात_2

 

नातं जगाच्यावेगळं

शेताशेताच्या बांधावर

घर कुणब्याचं चाले

सर्जा राजाच्या खांद्यावर_3

 

 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू