पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कळी

कळी


हळुहळु ती पहा उमलते

नाजुक सुंदर कळी,

पहाटवारा रुणुझुणु वाहे

प्रशांत शांत वेळी।


हळुच डोकवी आतुनी मगतो

भ्रमर अहाहा! पहा!

निशाही अवघी आत कोंडला

परागदूत हा धन्य महा।


कळी उमलता पुष्पही फुलते

सुगंध त्याचा धुंद किती!

दिशादिशातुनी तो च पसरवी

भ्रमर एक जणु धन्य यती।


कळीतुनी ते पुष्प उमलले

होण्या हरिचरणी लीन,

भ्रमर मात्र तो सदाच असतो

मकरंदसेवनानंदी तल्लीन।



©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू