पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मन माझे

हे तुमचे बोलणे 

माझ्या मना लागले

माझ्या डोळ्यांनी तेच बरोबर हेरले

मोती टपोरे नयनांतून वाहू लागले

मी समजावले तरी नाही ते थांबले

 

मनाच्या कोपऱ्यात

खोलवर काहीतरी टोचले

सल कसलीतरी

एवढेच मला होते समजले

मोती टपोरे नयनांतून वाहू लागले

मी समजावले तरी नाही ते थांबले

 

हळूच जाऊन जवळ

हलकेच त्याला मी होते थोपटले

माझ्या या खांद्यावर

त्याने आपले मस्तक मग टेकले

मोती टपोरे नयनांतून वाहू लागले

मी समजावले तरी नाही ते थांबले

 

आता वाटते मला

बरं झाले एकदाचे ते वाहून गेले

मन माझे खरंतर

एकदा हलके हलके आता झाले

आठवांच्या गर्तेत तसे भिजून गेले

मी समजावले तरी नाही ते थांबले

 

अरविंद गणपुले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू