पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

योगाभ्यास आणि मी

*योगाभ्यास आणि मी...*????????


...©मंजिरी

"लवकर निजे, लवकर उठे. तया ज्ञान, आरोग्य, धनसंपदा लाभे ." लहानपणापासून कानावर पडलेले हे शब्द आणि बऱ्यापैकी आचरणात पण आणलेले आहेत बरं का!!


 तर त्याचं असं झालं 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस.... या दिवशी मात्र थोडाफार योगाभ्यास करायचाच हे मनाशी ठरवूनच रात्री झोपी गेले. बाजूलाच झोपलेल्या नवर्‍यालाही म्हटलं," उद्या Yoga day आहे बर का! चालायला चला माझ्याबरोबर!! आल्यावर थोडे सूर्यनमस्कार ही घालू. किमान आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणून तरी".... "ठीक आहे." असं म्हणून नवरोजी झोपी गेले.

 

 मी जिथे राहते तिथे आजूबाजूला भरपूर झाडं आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट हमखास ऐकायला येतो.... तर सकाळी सकाळी साधारण किती वाजले माहिती नाही ...कर्णमधुर न वाटावी पण  कर्णकर्कश्य नक्कीच वाटावी अशा आवाजात एक कोकिळा गात होती. आज कुठे गेल तिच्या आवाजाचं नादमाधुर्य हे कळलच नाही.. घड्याळ पाहिलं तर साडेतीन???? अरे! हि काय कू Sजन करण्याची वेळ आहे का? जरा रागानेच म्हटलं. वाटलं आजच्या योगा डेचं फॅड पक्षांमध्ये पण आलेले दिसतेय. रोज गोड गळ्याने कुहूS  कुहूS ओरडणारी कोकिळा आज तिच्याही नवऱ्याला बहुतेक कर्कश्श आवाजात उठवत असावी????

 

जाऊदे गमतीचा भाग सोडा पण मंदमंद पहाट वार्‍यात चिमण्या, कावळे, कोकीळ, त्यातच बाजूच्या झाडावर घरटे असलेल्या साळुंख्या, पोपट असे अनेक पक्षी अगदी छान गो Sड आवाजात आजूबाजूच्या सोसायटी मधल्या योगाभ्यासी मंडळींना उठवायला तत्पर झाली होती म्हणा ना.ठीक आहे पण आता पाच वाजले होते. पहाट झाली होती. पटापट आवरून ठरवल्याप्रमाणे मॉर्निंग वॉकला जायची तयारी केली. नवरोबाला उठवायचा प्रयत्न चालूच होते. अहो! उठले ही बर का!पण म्हणाले "जा ...जा बाई तुला काही मी आडवत नाही. पण मला दिवसभर कामाचा व्याप असतो.तीन चार मजले, दोन-तीन वेळा चढ-उतार होते. तोच माझा व्यायाम. तू मात्र जा होS. तुझ्या ठरवलेल्या योगा डे च्या सेलिब्रेशनमध्ये उगाच माझ्यामुळे खंड नको."

 झालं!! म्हणजे यांच्या बरोबर वॉकला जाण्याचा योग काही जुळत नाही. जाऊदे! मी आपली आवरून मॉर्निंग वॉकसाठी उतरले. छान थंडगार हवा... थोडी गुलाबी म्हणावी अशीच थंडी अनुभवत छान चालून आले. येतायेताच ठरवलं आज योगा मॅट चा उपयोग तर व्हायलाच हवा. तिचीही गुंडाळी कधीतरी सुटायला हवी ना? आज तर हवीच हवी???????? चला,तासभर फिरून  येताना थोडी फुलं पानं पण आणली देवपूजेसाठी. अरे! जाता-येता थोडंथोडं पाणी घातलेलं असत ना सोसायटीतल्या झाडांना ?इतना हक बनता है ना? ????

 

डबे देऊन नवरोबांना आणि मुलाला दिले ऑफिसला धाडून आणि ठरल्याप्रमाणे सूर्यनमस्कार पण घातले बरं का!! अगदी ॐ मित्र,रवी, सूर्य,भानू,खग,पुष्य, हिरण्यगर्भ,मरीच, आदित्य,सवित्र,अर्क,भास्करेभ्योनमः.... एका दमात श्लोक म्हटला आणि सलग बारा नमस्कार घातले. हुश्श!!चार  नमस्कार पूर्ण झाल्यावर कुठेशी पायाच्या अंगठ्याला हात टेकले. पण काय छान वाटलं माहितीय. सूर्याने ऊर्जा प्रदान केल्यावर पुढची कामं जोमानं करूया म्हणून.... थोडाSवेळ शवासनात पडायचं ठरवलं.


 काय शांSत, कूल वाटत होतं. श्वासाची लय शांत आणि संयमित करत गात्र गात्र शिथिल करत असं अंग टाकलं मॅटवर आणि .....चिवS चिव Sचिव Sचिव S

 खिडकीत बसून एक पिटुकली चिमणी गोकर्णीच्या फुलांमधला रस अगदी आनंदाने टिपत होती... की मला उठवत होती???? 

 अरे बापरे!! सूर्यनमस्कार घातले दहा मिनिटात आणि शवासनात मी पंधरा मिनिट होते????????बरं तर बरं आजूबाजूला झाडं, पक्षी आहेत चिव चिव करत का होईना जागं केलं मला वेळीच.माझं मलाच हसू आलं???????? अरे पण हे काय हास्ययोग पण झाला की पूर्ण????

 

 आज काय योगायोग आहे पाहा .... मॉर्निंग वॉक, योगा, सूर्यनमस्कार, आणि शवासन सुद्धा बरका!! आणि त्याचबरोबर हास्य योगही...????????????

 

 मनाशी ठरवलं की सगळं साध्य करता येतं.... असं म्हणून योगा मॅट गुंडाळली आणि जागेला ठेवली. नुसती ठेवली नाही बरं का... उद्या पुन्हा उघडण्यासाठी गुंड़ाळून ठेवली.????????

  ठरवलंच आहे तसं मी, तुम्ही सुद्धा ठरवा. ????

  

*निरोगी तन आणि आनंदी मन* 

*हीच आरोग्यपूर्ण आयुष्याची हमी*

*मस्त खा स्वस्थ राहा ....आाणि*

*आळस थोडा करूया कमी*????????


...©️ *सौ.मंजिरी भातखंडे*

पुणे २१/६/२२

अंतरराष्ट्रीय योग दिवस

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू