पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शांत जलाशय.

*शांत जलाशय*

**************

शांत जलाशय , नाजुक लाटा

घोंगावतो मनी तो वादळ वारा


घनमेघ स्मृतींचे , काहुर अंतरी

मनांतरी मीच शोधितो निवारा


सामोरी ते दोन समांतर किनारे

भरूनी वाहते , पावन गंगाधारा


ओढ़ तिलाच त्या महासागराची

मिलनास , उत्सुक ती जलधारा


न तमाच तिजला सुखदुःखांची

या सरोवरी , ती शोधिते आसरा


झुळझुळ प्रवाही , नाद अनाहत

उजळीतो , भावप्रीतीचा गाभारा

*************************

*रचना क्र.१५४ / २४ - ६ - २०२२*

*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*????( 9766544908,)*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू