पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हे ही वर्ष निघून जाईल

हे ही वर्ष निघून जाईल  ....

~~~~~~~~~~~~~~ 

 

दोन वर्षांच्या खंडानंतर, 

दिसणार होतास रे आम्हाला, 

किती किती आनंद झाला म्हणून, 

काय सांगू तुला ....!

वारी तर निघाली, पण तू कुठे दिसलाच नाहीस, 

खरंच सांगतो देवा, जीव झालाय रे कासावीस. 

देहू-आळंदीहून देवा, संतश्रेष्ठ तर निघाले, 

पण त्या दिवसांपासुनच, तुझे दर्शन नाही रे झाले.

देवा पांडुरंगा, विठ्ठला आता तूच सांग रे मला, 

काय आमचा गुन्हा ? म्हणून आलंय् हे फळ वाट्याला.

कुणी तरी एकनाथ, अन् त्याने म्हणे बंड केले, 

अन् सगळ्याच चॅनलवाल्यांनी आपले कॅमेरे तिकडे  नेले.

चार दिवसात देवा, यांना वारी नाही आठवली, 

मुंबई, सुरत, गुवाहाटीलाच यांनी सगळी टीम पाठवली.

दोन वर्षांनंतर तुला, वारीत पाहणार होतो, 

पंढरपुरच्या वाळवंटात, फिरुन येणार होतो. 

पण कसलं काय अन् कसलं काय ? 

घरातच अडकून पडलेत रे पाय. 

आता चॅनलवाले दाखवतील, तेच फक्त पहायचं, 

तोंडाने मात्र, तुझं नाव घेत रहायचं. 

दोन वर्षांसारखं देवा, हे ही वर्ष निघून जाईल, 

पुढल्या वर्षी मात्र, तुझ्या दर्शनाला नक्की येईल, 

पुढल्या वर्षी मात्र, तुझ्या दर्शनाला नक्की येईल...!

 

 

दिवाकर चौकेकर, गांधीनगर (गुजरात) 

दिनांक  :  २५ जून, २०२२. 

????????????????????????????

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू