पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई.. तू हसायला हवी होतीस

पाऊसाचे येणे जाणे सुरूच राहील .
अंगण भिजेल , परसातील जाई भिजेल
पारिजातक भिजेल ..
घरावरील पत्रे आवाज करतील
पन्हाळीतून पाणी येईल , कंदील मिणमिण करेल ...
चूल भिजेल ..भिंतीला ओल येईल
त्या ओलीतून मातकट असा सुंदर वास येईल ..
गोगलगाई बाहेर येईल ..
अंगणात चिखल होईल ..
झाडांची पाने बहरतील
कर्दळीच्या कळ्या मान वर काढतील
खुंटीवरचे कपडॆ भिजतील ..
गोठ्यामधल्या रेडकाच्या कातडीवर थरथर होईल ..
दावण भिजेल
वाळवणे भिजीतलं ..
वैरण भिजेल ..
ओढ्याला पूर येईल ..
पूर बघायला पोत्याची कोपी करून सगळे जातील
काळी जुनी छत्री पुन्हा हातात येईल ..
काडीशपेटी सादाळेल ..
तेल मुंगळ्यांचा जन्म होईल ..
चिमण्यांची पळापळ होईल ..
चिमणी आपल्या पिलाला आपल्या पंखात सामावून घेईल ..
पाऊस येईल ..पाऊस जाईल ..
सगळे बहरेल .. स्वछ होईल ..
सकाळ होईल , संध्याकाळ होईल ..
वासरू हंबरेल..
खिडकी ओली होईल ..
तुळवदि भिजतील
मग मी तुझी साडी उशाशी घेईन
गालावरून तिचा काठ फिरवेन ..
उब येईल ..
मग
तुझ्या फोटोकडे बघेन
आणि म्हणेन
....
....
....
....
पाऊस बघायला तू ...
तू असायला हवी होतीस
आई

~वैभव ~

~वैभव ~

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू