पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पंढरीची वारी

*पंढरीची वारी *

 

पंढरीची वारी

जीवाला ती गोड

भक्तीला ही दिली

संसाराची जोड||1||

 

ज्ञाना, नामा, तुका

दावीयली वाट

देखिता सोहळा

डोळा अश्रू दाट||2||

 

वारीत शिकावे 

नाही मोठा लहान 

ध्यानी ठेवू सदा

कर्तव्य महान||3||

 

वैष्णवाचा मेळा 

चालला पाऊली

एकमेकात दिसें

साक्षात माऊली||4||

 

भक्त भेटीसाठी

देव झाला हरी

लेकूरवाळा तो 

उभा विटेवरी||5||

 

वारी अनुभव

जीवनात घ्यावा

एकमेका सदा

आंनद दयावा||6||

 

कवी प्रदीप कासुर्डे

नवी मुंबई 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू