पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नयनांच्या मधुशाळेत

.ललित लेख


नयनांच्या मधुशालेत तुझ्या!



        होतकरू चित्रकार असूनही चित्र दालनात बरीच गर्दी होती नि चर्चेचा विषय--- नयनांची मधुशाला! अप्रतिम देखणी केवळ नेत्र कमले... विवीध भाव दर्शविणारी... नि त्या मधुशालेत अवघे रसिक रमले होते..विवीध भावांचे रसपान करित होते. 


            वेलकम ..वेलकम ... कसे वाटतायत जादूभरे नयन?  रसिकाने झटक्यांत मागे वळून पाहिले.  नि ती  अवाक् झाली. हुबेहूब तिचेच डोळे चितारणारा तो साक्षात तिच्या समोर उभा होता. एका चित्र प्रदर्शनीच्या निमीत्ताने त्यांची भेट झाल्याचे तिला स्मरले. 


            नयनांची  ..मधुशाला... नयन तुझे जादूगार..  नेत्र तळी नीलकमले... कमलाक्षी.... हरिणाक्षी...मदिराक्षी... विवीध आकर्षक नावांनी तिचे डोळे चितारले होते. 

नि मग या नयनांचे त्या नयनी...  सुरू झाले.

             इशारो इशारोमे

             जादू चलाना

            ‌ बता दे ,ये हुनर

             तूने सिखा कहासे?


     म्हणत ..तिच्याभोवती त्याची नयन पांखरे  सदैव भिरभिरू लागली . . उफ! तेरीss आंखे! तेरी SS ये अदा ... करती है फिदा.. म्हणत रूंजी घालू लागली..


  तीही त्याच्या वर, त्याच्या हातातल्या जादूवर आसक्त झालीच होती.  


            दिवसभर कधी समुद्रकिनाऱ्यावर,कधी बागेत...कधी डोंगर द-यावर... निसर्गाच्या सान्निध्यात..रानोमाळी.. भटकंती सुरू झाली. ... मैत्री फुलू लागली. तिच्या  गहि-या डोळ्यांत डोळे घालून पहाताना  मन पाखरू वेडावले.. तिच्या डोळ्यांची जादू.... .लाजरे नेत्र कटाक्ष.. मोहक उघडझाप करणा-या नेत्र पाकळ्या... त्यातील त्याच्याबद्दलचे प्रेम...आकर्षण.... तिच्या नयनांच्या मधुशालेत तो आकंठ मधु पान करू लागला....नेत्रमदिरेने बेहोश होऊ लागला. प्रेमरंगात दोघेही चांगलेच रंगले. .. पावसाच्या जलधारात मनसोक्त भिजले...   तो चकोर ... तिच्या नेत्रांबरातून ओसंडणांरं शीतल मधु चांदणं प्राशुन तृप्त होऊ लागला....  तर कधी तिच्या डोळ्यातील सात्विकतेने प्रकाशणा-या तेजोमय ज्योती वर "पतंग" होऊन झेपाऊ लागला.



           तिच्या सानिध्यात त्याची चित्रकारीही बहरू लागली ...  अप्रतिम ...लावण्यमय... निसर्ग चित्रे... व्यक्ती चित्रे...(अर्थात तिचीच...)   आकारू लागली. प्रदर्शने गाजू लागली.... बक्षिसांची खैरात  होऊ लागली... नि अशाच एका प्रदर्शनात त्याने त्याच्या प्रेरणा स्त्रोत असलेल्या प्रेरणा देवतेशी.... त्याच्या चित्रदेवतेशी ..  त्या कमलाक्षीशी....लग्न करणार असल्याची घोषणा केली... तिच्या नयनांच्या मधुशालेत ...तिच्या मोहक टपो-या डोळ्यांत... तिच्या भावविभोर.. नेत्रडोही....तिच्या   मनोहारी नेत्रकमलात  ...कायमचं बंदिस्त होण्यासाठी!


सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू