पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काही निवांत क्षण

भरगच्च  या जगात

जाणवते एक पोकळी

हवी आहे एक जागा

तुझ्या माझ्यात मोकळी


हवे तिथे काही

निवांत आपले क्षण

जपेल त्या काळातील

सूक्ष्म कण अन् कण 


अत्तर त्या कणांचे

भरेल एका कुपीत

त्या सुगंधी क्षणांचे

 जाणेल मी गुपीत 


स्मृती त्या क्षणांच्या

असतील सुगंधित

आठवून तयांना

जीवन जगेल धुंदीत


पैशांपेक्षा अनमोल

असतील हे क्षण

सुखी  जीवनासाठी हवे

सोबतीला एक सच्चे मन 



सौ संगीता ताथोड 





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू