पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आजादी का अमृत महोत्सव

१५ ऑगस्ट२०२२ .
आज १५ ऑगस्ट२०२२ रोजी ईजिप्तची राजधानी कैरो येथे आजादी का अमृत महोत्सव थाटात , अभिमानाने साजरा झाला.
सकाळचे प्रसन्न वातावरण . सुखद आल्हादक हवा . कैरो येथील भारतीय दूतावास ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते . दूतावासाचे म्हणजे ' इंडिया हाऊसचे ' भव्य प्रांगण भगव्या, पांढऱ्या व हिरव्या फुग्यांनी , कमानींनी सजवले होते .
बरोब्बर नियोजित वेळेनुसार भारताचे ईजिप्त येथील राजदूत श्री. अजित गुप्ते ह्यांनी कमानीतून प्रांगणात प्रवेश केला आणि तिरंग्याची दोरी खेचताच , भारताचा मानदंड , तिरंगा डौलात फडकू लागला . राष्ट्रगीताची धून सुरू झाली . राजदूत श्री . अजित गुप्ते व उपस्थितांनी ध्वजाला सॅल्युट केला .
तोपर्यंत उन्हाची तीव्रता थोडी वाढू लागली . उपस्थितांना दूतावासाच्याच विस्तीर्ण प्रांगणात मंडप टाकले होते तिकडे बसण्याची सोय केली होती .
राजदूत श्री. अजित गुप्ते ह्यांनी सर्वांचे स्वागत केले आणि राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश वाचून दाखवला . त्यानंतर राष्ट्रभक्तीपर गाणी , भारतातून आलेल्या कथ्थक नृत्य कलाकारांची नृत्ये , काही देशभक्तीपर वैयक्तिक गाणी असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला .
मी सध्या कैरो मध्ये असल्याने मलाही माझ्या दोन कवितांचे वाचन करण्याची संधी मिळाली .
आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गायन स्पर्धा , लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच NRI गट 'स्थानिक गट ;Embassy Staff अशा विविध गटांकरिता भारतविषयक माहितीपर आधारित Quiz, General knowldge अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या . त्याचा बक्षीस समारंभ श्री . गुप्ते हयांच्या हस्ते झाला .
स्थानिक लोक , NRI , विद्यार्थी ,Embassy staff अशा सर्वांना समाविष्ट करण्याच्या राजदूत श्री . अजित गुप्ते यांच्या समायोजकतेचे कौतुक वाटले .

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर अल्पोपहार आयोजित केला होता .
दूतावासाचा स्टाफ कुटुंबियांसमवेत , भारतीय लोक, ईजिप्तमधील लोक मिळून सुमारे ३०० लोक उपस्थित होते .
एकंदर वातावरण देशभक्तीने भारावलेले होते .

जय हिंद , भारतमाता की जय

काही क्षणचित्रे

 

 


लेखिका ः
सुलभा गुप्ते .
कैरो .
१५ ऑगस्ट २०२२

_ x _

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू