पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पूर्तता

पूर्तता 


मनी आस पूर्तीची साक्षीस ठेव काळा

मागे वळून आता लावू नकोस डोळा ।। धृ. ।।


माझ्या मनास वाटे सत्यासी भुलवावे 

स्वप्नात येउनीया अंकी तुझ्या स्थिरावे ।

विसरु कसा गं हळुवार स्पर्श भोळा

मागे वळून आता लावू नकोस डोळा ।। १ ।।


म्हणसी मला गडे तू स्वप्नात येऊ का

तेथे तरी मला तू सहवास देसी का ।

भिडलाच ना मनी भरला तुझा गळा

मागे वळून आता लावू नकोस डोळा ।। २ ।।


उगमातला प्रपात धुंद यौवनाचा

शांतून तन प्रवाही ध्यास मीलनाचा । 

आनंद अर्पणात की सूख जन्मकळा

मागे वळून आता लावू नकोस डोळा ।। ३ ।।


जन्मास पुष्प यावे देवा पदी पडावे

वा कृष्णकुंतलांस गुंतून गंधवावे ।

आशा उरी बळावे देण्यास परिमळा

मागे वळून आता लावू नकोस डोळा ।। ४ ।।


©️ भालचंद्र (मिलिंद) चितळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू