पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बाळकृष्णाची पाउले

*बाळकृष्णाची पाउले* 


खेळ खेळता शोधित आई भिरभिर डोळे इवले ।

दुडूदुडू धावे बाळकृष्ण तो उमटवीत पाउले ।। ध्रु. ।। 


वसुदेवाचे भाग्य उदेले कृष्ण जन्मला कुळामधे । 

ईश्वरांश निवडोनि देवकीस पू्र्वपुण्यप्रारब्धे ।। 

मूल आठवे कंसा वधण्या कारागृही प्रकटविले ।

दुडूदुडू धावे बाळकृष्ण तो उमटवीत पाउले ।। १ ।। 


उग्रसेन महाराज बंदी कंस मातला मथुरेत । 

त्याच्या असुरी सत्तेपुढती सर्व रयत भयभीत ।। 

भीतीमुक्त करण्या गोऽधनास कंस चाणूर वधिले । 

दुडूदुडू धावे बाळकृष्ण तो उमटवीत पाउले ।। २ ।। 


लोणी चोरण्या फोडीत मडकी अवखळ कान्हा द्वाड । 

तरीही गोपिका गोकुळी करिती प्रेमभराने लाड ।। 

राधा विहरत कालिंदी तटी श्रीरंगास भुलविले । 

दुडूदुडू धावे बाळकृष्ण तो उमटवीत पाउले ।। ३ ।। 


दुधात असते लोणी तसेच फळ  कर्मांत लपले । 

कर्मयोग ही ईश्वरपूजा अंतरी विचार भिनले ।। 

नित्य जीवनी रत निष्काम तत्त्वचि मनी जे ठसले । 

दुडूदुडू धावे बाळकृष्ण तो उमटवीत पाउले ।। ४ ।।


पाच पांडव आणि द्रौपदी उद्धरिले अनुसंधाने । 

भूत माहिती जाणी भविष्या वागे संयमी वर्तमाने ।। 

युद्धभूमीवर धनंजयाला गुह्य ज्ञान ऐकविले । 

दुडूदुडू धावे बाळकृष्ण तो उमटवीत पाउले ।। ५ ।।


भालचंद्र चितळे (मिलिंद)

९८७०४१४०३१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू