पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भरा आनंद जीवनी

????भरा आनंद जीवनी????
○○○○○○○○○○○○○○○○
आली दिव्यांची अवस
आली सर्त्या आषाढात
दिन शुभ अवसेचा
सारे दिवे पुजतात ॥धृ॥
शुभाशुभ विसरुन
यारे सारे प्रकाशात
सारी विसरुन जारे
अंधश्रद्धा अंधारात॥१॥
काय श्रावणाचे दिन
शुभ सारे असतात
विना कारणच सारे
अज्ञानात फसतात॥२॥
श्रावणाचं नातं पहा
निसर्गाच्या हिरव्यात
वृक्ष वल्लरीत गाणं
त्याचं पाखरे गातात॥३॥
घ्यारे सृष्टीचा आनंद
रहा सारे आनंदात
भरा उरल्या सुरल्या
आनंदाला जीवनात॥४॥
*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
????????????????????????????????????????????????????????
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू