पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

घननिळा श्रावण

अष्टाक्षरी रचना

शिर्षक----

घननिळा श्रावण



रिमझिम रिमझिम

रूणझुणं रूणझुणं

नाद श्रावण सरींचा

सुरमयी    झंकारणं.


घननिळा तो  श्रावण

अंगोपांगी बहरला

रंग,गंध चैतन्याने

आसमंत  हा भारला


घननिळा श्रावणांत

ऊन पावसाचा खेळ

प्रगटतो इंद्रधनु

नील नभी रंगमेळ


पक्षी विहरती  मुक्त

वृक्षराजी ती सुस्नात

आनंदाने भारलेली

धरा   आणि‌  प्राणीजात


"राजा" शोभे महिन्यांचा

मास हा सणवारांचा

सात्त्विकता,मांगल्याचा

माह   व्रतवैकल्यांचा



रानी,मनी रंग हरा

शांती सुखसमृद्धीचा

देशभक्ती देशप्रेम

दिन येई स्वातंत्र्याचा.


घननिळा श्रावणांत

भाऊ बहिण प्रेमबंध

येई भर प्रणयाला

जुळे  तो रेशीम बंध.


असा हा श्रावण मास 

आवडतो हो सर्वांस

हर्ष   मोद उत्साहाने

सज्ज होऊ स्वागतास.


सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू