पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पानवाल्याचं पोर

सांगलीच्या पानवाल्याचं पोर

यशासाठी लावला त्यांनी रात्रंदिवस जोर 

गरीबी बनली नाही त्याच्यासाठी कधी कारण

त्यानं दोष दिला नाही तिला विनाकारण

होती त्याची मोठी जिद्द

पार केली त्यांनी सर्व अडथळ्यांची हद्द

जरी जखमी झाला तो

तरी आशा बाळगून होता तो

पूर्ण ताकद लावली पणाला 

रौप्यपदक जिंकून आणलं त्या क्षणाला

देशाची मान केली अभिमानाने ताठ

दाखवून एक वेगळी वाट

दुखापतीमुळे हुकले सुवर्णपदक

पण जिद्दीने आणले रौप्यपदक 

नाव त्याचे संकेत सरगर

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा वेटलिफ्टिंगमध्ये केली सर 

©®-विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर

भ्रमणध्वनी 9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू