पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नागपंचमी

नागपंचमी


कृषिवलसुहृदा ललना पूजिती

सण असे त्या सर्पांचा

चला पूजुया वारुळाला

वा घरीच पुजुया चित्राचा!


दूध नि लाह्या तया अर्पुनी

पूजन करु त्या प्रतिमेचे

सर्पही झटती जनउपकरा

करुनी रक्षण शेतीचे।


मूषक भक्षुनी उदरही भरती

नसे उपद्रव कोणाला!

त्या उपकारा स्मरोनी सख्यांनो

चला पूजुया सर्पाला!


तवा न ठेवु चुल्ह्यावरती

भाजेल तयाचे मृदुअंग!

कढई सत्वर लपवुन ठेवु

चटके बसुनी होईल बेरंग!


दिंड खाऊनी मंगलदिनी या

अर्चन त्याचे करु!

उपकारच हो त्या सर्पांचे

वंदन त्यांना करु।


©️ डाॅ.श्रीकांत औटी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू