पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बुवाबाजी डॉट कॉम

*बुवाबाजी डॉट कॉम !*

गावगावी पसरले महाराजायचे जाळे !
संतायच्या नावे करती धंदे भोंदु काळे!

लोकायच्या श्रद्धेचा फायदा पुरा घेती
सोताले गजानन साई म्हनुन घेती !

भाविकायच्या खिशाले कैचि लावती हळुच !
भक्तायले बाबा लुटती गोड गोड बोलुन !

उपजिविकेचं काही साधन नाही त्यायले !
तरि बाबा चढवतेतं मजल्यावर मजले !

गल्लोगल्ली थाटले दिसती महाराजायचे दुकान !
महाराजायच्या प्रस्थाविना दिसे नाही मकान !

भांडवल नाइ शिक्षन नाइ मेहनत नाइ लागत !
माल देती पाया पडती बाया बापड्या भगत !

आयकर ना विक्रीकर ना कोंता कर लागत !
मंत्री संत्री दरबारात येती जोडे घासत !

ह्याच धंदा दिसते मले मस्त आनं स्वस्त !
सुरु करा जोरात टाकुन माह्यावरी भिस्त !

धंद्याच्या या सल्यासाठी मले येउन भेटा
' बुवाबाजी डॉट कॉम 'च्या पत्यावरी खेटा !

कवी -- अनिल शेंडे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू