पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

यत्र नार्यस्तु पूजते

प्रकृती आणि पुरुष ही एकमेकांना आधार आहेत, पुरुषांच्या शिवय प्रकृती,किंवा प्रकृती शिवाय पुरुष यांच्या वेगवेगळेपणाची कल्पना न केलेलीच बरी.उदाहरणच द्यायचं झालं तर हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचा भक्तीसंप्रदयावर आधारित "नवनाथ भक्तिकथासार "या ग्रंथात स्री राज्याचं सविस्तर वर्णन आहे,त्या ठिकाणी असलेली शासन व्यवस्था पाहिल्यास त्यामध्ये कुठे ही ,पुरुष नावाला देखील स्थान नाही,तर मग परिपूर्ण पुरुष कुठे...
   नाथांचे मुख्य शिष्य "मच्छिंद्र नाथ"यांना आपल्या आणि श्री राम भक्त हनुमान यांच्या वचनपूर्तीसाठी स्री राज्यात विहार करावा लागतो... एक तर स्री राज्यातील नियम हे अतिशय कड्क, अवघड आणि त्यावर कोणाला न भेदता येणार हनुमंत रायच सुरक्षा कवच आपल्यावर दाखवू नये, यासाठी गुरू मच्छिंद्र नाथांचे, शिष्य "गोरक्षनाथ" युक्ति लढवतात...
मचछिंद्रनाथ यांना स्री राज्यातुन आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी नाच गाणी करणाऱ्या एका स्रीचा आधार तर घ्यावाच  लागला गोरक्षनाथ यांनी स्वतः चे वेषांतर एका स्री प्रमाणे केले...राजमहालात त्या महिला कलाकारांचा संगीत कार्यक्रम होत असतो हे गोरक्ष नाथांना माहीत असेल त्यानुसार ते मोठ्या युक्तीने स्री कलाकार मैफिलीत सामील होतात.... पुढे काही दिवसांनी ते आपल्या गुरुला घेऊन जाण्यात यशस्वी होतात...(कथेचा हा भाग अधिक सविस्तर जाणुन घेण्यासाठी नवनाथ कथासार हा ग्रंथ पहावा किंवा ,यु टुयब ,वर देखील पाहु शकता)
    थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपण तुलनात्मक दृष्ट्या स्री अन् पुरुष दोघांना सामान पाहतो पण उदहरणदाखल याचं विभाजन केले तर पहिला प्रश्न पडतो की जर स्री एकटीच आहे तर पुरुषाची उत्पत्ती कशी होणार? अन् पुरुष उत्पत्ती झाली नाही तर मग स्री उत्पत्ती कशी होणार? आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की याचा इथ काय संबंध,तो असा बऱ्याच स्रीया बोलतात आजही त्यांच्यावर अन्याय केला जातो चुल, आणि मुल या चक्रात त्यांना भरडल जातं आशी एक बाजू तर दुसरी बाजू पहिली तर आताच मुंबईत काही पुरुषांनी एकत्र येऊन आपल्याच बायकांचे जितेपणी श्राद्ध विधी पार पडले...हे सर्व का होत? या पुरुषांवर अन्याय होत नाही का?की वर सांगितल्या प्रमाणे त्या महीलांना खरच जाच आहे का? असेल तर मग असे का?हे कुठे थांबेल ...
स्री असो की पुरुष यांच्या पैकी कोणताही एका ठराविक गटाची पाहणी करून अत्याचार करणारा किंवा अत्याचार सहन करणारा वर्ग गट ठरवता येत कणाच्या गटावरून  भाताची परीक्षा केली जाते माणसाची नाही...
       
      संसाराच्या रथाची चाके सारखी चालत असेल तर जीवनाची यात्रा सुखद आणि आनंदमय होते...
वेळ समजाऊन घेत एकमेकांना आधार देण्याऐवजी एकमेकांच्या चुका शोधत बसु नये...
जर पती राम नाही, तर मग स्री तरी कशाला सीता होईल... 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू