पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी कोण आहे

मी कोण आहे?
मी म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला दिलेले नाव का? उदाहरणार्थ मी पंकज मी प्रताप आहे मी अशोक आहे मी पिंकी आहे, मी प्रियंका  आहे ,म्हणजे वास्तव ज्या शरीराला हे नाव दिलं ,तो मी असतो का? नाही तर,मग मी म्हणजे नेमकं काय? कोण?...
सर्वसाधारणपणे माणसाचे मानसिक स्तरावर आणि शारीरिक स्तरावर असे वैचारिक  प्रत्येकाचे द्वंद चालू असते...
मी कोण आहे ?या प्रश्नाचे उत्तर शोधत  असताना सर्वप्रथम शारीरिक स्तरावर हात ,पाय ,बोटे, डोके, केस नाक ,डोळे, कान, चेहरा या सर्व इंद्रियांना गृहीत धरून आणि या सर्व इंद्रियांनी परिपूर्ण असलेल्या शरीराला योग्य पाहिजे असलेल्या सेवा साधना मनोरंजन पुरवण्यात  प्रत्येक जण हा स्वतःला (म्हणजे मी ला)विसरूनच जातो . शरीरामध्ये एक अदृश्य ऊर्जाशक्ती असते तिला  आपण आजपर्यंत प्राण, आत्मा ,सूक्ष्मदेह अशा विविध नावाने ऐकलेला आहे जगतो आहे जाणतो म्हणतो याविषयी विचार केला आहे का? कधी कोणी? तर पूर्णता नाही पण जवळजवळ नाही असंच उत्तर देता येईल...
त्वच्या आणि हाडांच्या पासून बनलेल्या या देहांच्या इच्छा पुरवण्यात आणि सभोवतालच्या वातावरणात आपण इतकं गढून जातो की, कधी स्वतःला वेळ देण शक्यच होत नाही हे जरी मान्य असलं तरी प्रत्येकाला आपल्या जीवनात काही ना काही ध्येय हे गाठायचं असतं, स्वतःच्या विचार विश्वत, स्वतःच्या स्वतंत्र घरच, स्वतःचे कुटुंब, स्वतःचा धर्म,  स्वतःचे नातेवाईक हे सर्व माया चक्र यामध्ये आपण पूर्ण गुंतलो जातो असं म्हणण्यापेक्षा, स्वतः होऊन गुंतवून घेतो आणि या सर्वांमध्ये वर जो, "स्व" आला आहे त्या स्वत्वाला म्हणजे आपण स्वतःलाच ओळखत नसतो .आपण कोण आहोत? काय उद्दिष्ट आहे आपल्या जगण्याच? का जन्माला आलो ...
ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो ,ज्या कुटुंबामध्ये आपला जन्म होतो त्या कुटुंबामध्ये त्या समाजामध्ये लहानच मोठ होत असताना त्या समाजाच्या चालीरीती, परंपरा या सर्वांचा प्रभाव आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर हा जाणते व आजाणते पणाने पडत असतो, उदाहरणार्थ, हिंस्र प्राणी , हे हिंस्र असतात पण बरीच कुटुंब हे असे प्राणी पाळतात ,त्यामध्ये सर्प असो वाघ असो यासारखे प्राणी अनेक ठिकाणी कौटुंबिक पातळीवर देखील पाळताना आपण बघितले आहे. ज्या समाजामध्ये वाढत असतात त्या समाजाचा त्यांच्यावर परिणाम हा होतच असतो कारण वास्तविक्  प्राण्यांचा जो समाज आहे त्यांचं राहणीमान हे वेगळं असतं आणि मानवी समाजात आल्यावरती त्यांचं राहणं यामध्ये खूप तफावत असते, ज्या ठिकाणी,  संस्कार यादेहावर घडत असतात त्यानुसार प्रत्येक प्राणी समूहाचे हाव, भाव हे बदलत असतात... जंगलातील वाघ आपली भूक भागवण्यासाठी समोर दिसेल त्या जीवमात्राचा घास घेतात .मग तो जंगली प्राणी असो किंवा समाजात राहणारा मनुष्य प्राणी, तो कोणावरी दया दाखवत नाही, किंवा विचारून येत नाही, मी तुला खाऊ का?....
     तसाच वाघ सर्कशीत असतो, पण या ठिकाणी मात्र चित्र वेगळेच असते, सर्कशीच्या रिंग मास्टरच्या छडीच्या दिशेनुसार वाघाचं प्रत्येक स्वतःच वेगळेपण, अस्तित्व हळूहळू विसरत जातं ,आणि सर्कशीचा रिंग मास्टर शिकवेल तेच त्याच्या अंगवळणी पडतं.. अन् कालांतराने तो एवढा नम्र होतो की, कोणीही येऊन त्याच्याबरोबर सेल्फी काढत...
        महाराष्ट्राचा इतिहास पाहिल्यास त्यामध्ये अनेक राजे महाराजे यांनी केले, पण विशेष नाव घेतलं जातं ते म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांच, धुमाकूळ घालणाऱ्या अशाच हिंस्र प्राण्यांना महाराजांनी चांगलेच धडे शिकवले यावरती एक नावाजलेले वाक्य आहे,  "वाघाच्या जबड्यात ,घालुनी हात ,मोजिती दात, ती, जात मराठ्यांची" त्यांनी शारीरिक योगदान तर दिले पण वैचारिक देखील आहे...
         इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी हा वेगळा आहे, याची तुलना जर करायचे ठरवले तर माणसाने आपला हेतू पुरस्सर करून घेतलेला विकास याचं उत्तम उदाहरण आहे ,पण हा विकास माणसाने कशाच्या जोरावरती घडवून आणला तर त्याचे उत्तर "बुद्धी" असा आपल्याला देता येईल हो "बुद्धीच"इतर प्राण्यांपेक्षा मानवाकडे वेगळे आहे ते म्हणजे बुद्धी ती मानवाकडे अधिक प्रमाणात आहे, म्हणजे इतर प्राण्यांमध्ये बुद्धीचा अभाव आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही आहे त्यांच्यामध्ये देखील बुद्धी असते पण ते बुद्धीचा वापर अति प्रमाणात करत नाही किंवा त्यांना आवडत नसावा... बुद्धी संदर्भात हिंदू धर्म ग्रंथातील हरिपाठ या पुस्तकांमध्ये एक ओळ आलेले आहे , ती म्हणजे " बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे | एका केशवराजे सकळ सिद्धी||" आणि इथेच खरी परीक्षाअसते, आपण आपल्याला मिळालेले सर्व आवय वापरतो पण,बुद्धी वापरतो पण शारीरिक सुखासाठी, सुखांची पूर्ती करण्या साठी... बुद्धी वापरतो यशाची सर्व शिखरे पार करण्यासाठी यश मिळालं म्हणजे आपण शांत बसतो का ?किंवा किती यश मिळाला म्हणजे आपण शांत होऊ, किती पैसा किती संपत्ती मिळवली म्हणजे आपण थांबणार आहोत, याची कधी कोणी शाश्वती देऊ शकत? तर नाही, देशाचा आणि राष्ट्राचा विकास करायचा असेल तर हे थांबायलाही नको हे देखील तेवढेच खर आहे, पण एका जीवाने ,प्रवास हा एका मर्यादेमध्ये कुठपर्यंत किती करायचा याचा कोणीही मापदंड ठरवू शकत नाही, ज्याला त्याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे शारीरिक आणि मानसिक पातळीवरती, पण यशाची किती शिखरे ओलांडली म्हणजे मी, म्हणजे आत्मा थांबणार आहे याला मुळात मापदंड हा की, "मी" म्हणजे "स्वतः आत्माच" घालून घेऊ शकतो. कोणाला शांतता, आनंद, परमानंद अनुभव कधी करून घ्यायचा हे ज्याचं, त्याचं ज्याला ,त्याला ठरवायच  असत. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि इथल्या संतांनी इथेच नाही तर संपूर्ण भारतभूमीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर देखील अध्यात्माचे शांततेचे आत्म सुखाचे परमानंद प्राप्त करून घेतल्याचे उदाहरण आपल्याला कित्येक सांगता येतील ,संत परंपरेतील संत गोरोबा, संत एकनाथ ,संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई अशा अनेक संत यांनी या भूमी त सदैव सदेह नीची म्हणजे स्वतःची आत्मानुभूती घेतलेली आहे.... संत तुकारामांनी या समाजामध्ये जे तुकाराम गाथा निर्माण केली, ती  निर्माण झाली, त्यांना कशी सुचली , "तुका आकाशा एवढा "... संत ज्ञानेश्वर यांनी आपले आणि आपल्या भावंडाचे उपनयन संस्कार करण्यासाठी किती कष्ट सहन केले या समाजाचे किती बोल त्यांना सहन करावे लागले, संन्याशाची पोर म्हणून जगणारी भावंडे पाहता, पाहता  समाजासमोरच चमत्कार करू लागले, ज्यांनी दगडाची भिंत चालवली  कुंभाराने मडके दिले नाही म्हणून, पाठीवर मांडे भाजले रेड्याच्या मुखी वेद वदविले, ज्यांनी ज्ञानेश्वरी अमृत अनुभव हे सारखे ग्रंथ समाजाला दिले त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी का समाधी घेतली असावी, या मागचं कारण आपल्याला शोधायचं नाहीये आपल्याला शोधायचंय "मी" कोण आहे या प्रश्नाचे उत्तर... माझ्या मते या संत मायबापांनी स्वतः मधील" मी " खऱ्या अर्थाने जगला... "मी" जगला खरा गौतम बुद्धांनी ... सर्व संपन्न असणारे राजभवन सोडून संन्यास स्वीकारण्याची काय आवश्यकता होती का? नाही,पण त्यांना जाणवलं होतं हे सुख शाश्वत नाहीये आणि जे शाश्वत नाहीये त्यासाठी "स्वतःला" म्हणजे "मी"ला गुंतवून ठेवल नाही,तर मोकळ केला सर्व बंधनातून, सर्व नात्यातून आणि अनुभवलं खरं "मी" पण....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू