पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गारुड

गोड गुज कळू आले सांज पेलत्या उन्हाला

निल गव्हाळ डोळ्याचे झाले गारुड मनाला

 

आत कल्लोळ वादळी जादू कशी गं घडली

रानबाहाव्याची  जणू भूल जिवा या  पडली

पिंगा  घालितो  भोवरा  अंतरात  गोल गोल

मनी झिम्माड ढगांचा  आत वाजतोया ढोल

दिले अवतान तू गां  प्रीत खुळ्या साजनाला

निल गव्हाळ डोळ्याचे...........

 

पायी आपोआप आला तनमोराचा या डौलं 

सांगू जाऊन कुणाला तुझ्या पापणीचा कौल

झाले  आभाळ  ठेंगणे मनी मोगऱ्याचा गंध

माझ्या  मनाची  कवाडे उघडली आज  रुंद 

कासावीस कान माझे कोकिळेच्या कूजनाला

निल गव्हाळ डोळ्याचे............

 

रानफुलांच्या  माळू दे  सप्तरंगी गळा माळी

तुझ्या माझ्या हाताची या वाजू दे ना एक टाळी

घुमू  दे  ना  एक  नाद  ताल सूर  एक  राग

आज  नव्याने  हृदयी  साकारू दे फुलबाग 

गाणे  नवेच  बहाल  करू  दे ना  सृजनाला 

निल गव्हाळ डोळ्याचे.............

 

                  -भानुदास धोत्रे

                   परभणी

                   7972625086

bhanudasdhotre2015@gmail.com

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू