पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वर्ग की नरक !

*स्वर्ग - नरक* 


रेषेपलीकडे त्या

जाणे न चुकले कुणाला

जिवन पलीकडले त्या

ना आजवर कळले कुणाला ॥१॥


किती कठोर निष्ठुर निर्दयी

हि रेषा , देइ भेद जगण्याला

विसरल्या विना " अलीकड" चे

ना कळतो प्रवास " पलीकड" ला ॥२॥


कुणी म्हणे आहे "स्वर्ग " पलीकडे

कुणा भिती " नरक " असल्याची

प्रत्यक्ष पाहिले सांगणारा स्वतःनी

ना भेटला असा , आजवर कुणी ॥३॥


हे रहस्य जाणण्याचा 

मार्ग मात्र " जिवघेणा "

भेटल्याविना " मृत्यु "ला

ना कळतो , पुढचा ठाव ठिकाणा ॥४॥


चोपडीत "चित्रगृप्ता "च्या, म्हणति

पान पुण्याचे ज्याच्या

लाभतो मार्ग त्यास स्वर्गाचा

पाप्यास यातना नरकाच्या ॥५॥


सौख्य , निरामयी , निश्चिंत जिवन

अन्य कोणता " स्वर्ग " असावा 

दुःख , यातना , अस्वस्थ जगणे

" नरक " न दुसरा अन्य असावा ॥६॥


                        ..... प्रदिप राजे

                               रोहा - पुणे

                     २५ / ०९ / २०२२

                    सर्वपित्री अमावस्या

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू