पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खांद्यावरच्या पदराला ती

खांद्यावरच्या पदराला ती 

~~~~~~~~~~~~~ 

 

खांद्यावरच्या पदराला ती बोटावर गुंडाळत असते, 

जणू काय ती ह्या चाळ्यांनी दोन जिवांना सांधत असते ....

 

रागलोभ अन् हेवेदावे इथे न चुकले कधी कुणाला, 

विकार असले उखळामध्ये टाकूनच ती कांडत असते ....

 

तिच्यामुळे ह्या घरास माझ्या घरपण आले उघड सत्य हे,

तिची नोकरी सांभाळून ती घरात सुध्दा रांधत असते .... 

 

इथे तांबडे फुटण्याआधी जुंपुन घेते रोज स्वत:ला,

असे खपोनी घरास अमुच्या नीटनेटके मांडत असते .... 

 

तिला न जमले कधी कुणाशी वाद घालणे भांडण करणे, 

पण नियतीशी ती एकाकी झुंजत असते भांडत असते .... 

 

अता न उरली मला काळजी " दिवाकराच्या " संसाराची,

विष्णू संगे जशी लक्षुमी तशी इथे ती नांदत असते .... 

 

 

 

दिवाकर चौकेकर, गांधीनगर (गुजरात)

मोबाईल  :  9723717047. 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू