पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आठ अति लघुकथा

*????आठ अती लघु कथा*

*[अ ल क]*
*#राज्ञी*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

अपेक्षा

लालची अपेक्षा मला म्हणाली तुझ्यात राहू का?

माझ्यात जागे पेक्षा अधिकचे काहीही मिळणार नाही म्हणताच, निघून गेली.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

गरज

गरजेला म्हटले योग्य वेळी गरजेपुरती तरी उपयोगी पडत जा...!!

लागलीच म्हणाली "गरज तुला आहे, मला नाही. आदराने वागवणे शिक आधी."

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

संधी

मला कधी संधी कधी मिळणार ? संधीला उद्देशून बोलताच.....!!

सहजासहजी मिळायला मी कुठे तुझी वाट बघत बसलेय.शोध म्हणाली.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

हिरा

कितीही अनमोल असला तरीही तू तर कठीणच.

अंधःकारमय कोळशाच्या खाणीत राहुनही काळवंडलो नाही‌ तर चकाकत राहिलोय ना म्हणून असेल कदाचित....!! उत्तर आले.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

शेजारच्या काकु कडून आणलेली सपाट वाटीभर साखर परत देताना वाटीपेक्षा अधिक दिली.एवढी जास्त का ? विचारले असता...

संबंधातील गोडवा अधिक वाढावा म्हणून. आईने उत्तर दिले.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

मोरपीस

मोराला पंखाचा उपयोग फक्त कौतुक करून घेण्यासाठी होतो, बाकी काही फायदा नाही तरीही तो पिसांचा भार का सांभाळतो?

आपण कष्ट केल्याशिवाय ओळख निर्माण करू शकतो का? आइतखावूला समाजात मान नसतो अगदी तसेच मोराचे असते बघ....!! ऐकताच कर्तव्याला दिशा मिळाल्यासारखे वाटले..
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

कापूर/पारा

कापूर असो वा पारा क्षणात उडून जातात तरीही त्यांचे अस्तित्व का मानावे?

असेच तर असते राग आणि दुःखाचे. ते तरीही आपण कवटाळून बसतोच ना!! थोडक्यात दृष्टांत कळाला.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

देव आणि कळस

देव आणि कळस यामध्ये श्रेष्ठ कोण असू शकतो?

जो देवाजवळ जाऊन लीन होऊन जो येतो, कळस त्याचा मान उंचावतो.मग तुम्हीच ठरवा श्रेष्ठ कोण?

सौ.प्रज्ञा कुलकर्णी
#राज्ञी

*[अ ल क] आवडल्यास नावासहीत शेअर कराव्यात ही विनंती.*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू