पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई जगदंबे

आई जगदंबे , जगदंबे ,
जगताची माऊली
मजवर धरसी ग, धरसी ग
करुणेची साउली
तुजविण कोण दुजा $ $
तुजविण कोण दुजा,
जगी माझा कैवारी
आलो शरण तुला,शरण तुला
माते मजला तारी ।। आई जगदंबे...

आपुल्या पुत्रासी, पुत्रासी ,
माताची उद्धारी
भक्ता उद्धरण्या , उद्धरण्या ये
व्याघ्रावर तव स्वारी
विविध आयुधे $ $
विविध आयुधे
हस्ती आपुल्या धारी
शुंभ- निशुंभाला , महिषाला
दैत्याला संहारी ।। आई जगदंबे...

ऐसी तव महिमा, तव महिमा ,
म्या पामरे किती गावी
मजसम दीनाची , दुबळ्याची
करुणा तुजला यावी
तुझिया गावाचा $ $
तुझिया गावाचा
सन्मार्ग मजला दावी
आलो दरबारी , दरबारी
माते मजला पावी ।। आई जगदंबे ...

कवी -- अनिल शेंडे .

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू