पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वेदनेला ती उराशी माळते

वेदनेला ती उराशी माळते  ( गझल )

~~~~~~~~~~~~~~ ~~~~

 

 

वेदनेला ती उराशी माळते, 

मी जसा आहे तसा सांभाळते.... 

 

खूप काही कौतुकाने सांगते, 

खूप काही बोलण्याचे टाळते... 

 

धीट ती आहे तशी, मी जाणतो, 

मात्र अश्रू एकट्याने ढाळते... 

 

प्रेम करते का कुणी दु:खावरी,  

ही शहाणी त्याचवरती भाळते....

 

हा " दिवाकर " हार आता मानतो, 

जीव इतुका ती स्वत:चा जाळते.... 

 

 

 

दिवाकर चौकेकर, गांधीनगर (गुजरात) 

मोबाईल  :  9723717047. 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू