पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तिला पाहण्याचा

तिला पाहण्याचा  ( गझल )

~~~~~~~~~~~~~~~

तिला पाहण्याचा मला मोह झाला,

नको तेवढा मग उहापोह झाला .....

 

जरी रोखतो मी अता आसवांना, 

पहा डोळियांचा पुन्हा डोह झाला .... 

 

दया अन् क्षमा हे स्वभावात होते, 

तरी माणसाचा बघा लोह झाला .... 

 

लळा, प्रेम, माया, उमाळा, जिव्हाळा, 

अशा सदगुणांचा बघा पोह झाला .... 

 

तुला सांगतो सत्य आता " दिवाकर ," 

अरे, माणसाशी तुझा द्रोह झाला ....!

 

 

 

दिवाकर चौकेकर, गांधीनगर (गुजरात) 

मोबाईल  :  9723717047. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू