पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दुसरा असणार कोण?

आभाळाच्या पडद्यामागे दडला आहे कोण ?
हा तर आहे चंदामामा दुसरा असणार कोण ?
ढुम ढुम ढुमुक्क ढुम ढुम ढुमुक्क ढुम ढुम ढुमुक्क ढुम ll

आंब्याच्या या झाडावरती कुहु कुहु करतो कोण ?
हा तर आहे कोकिळ काळा दुसरा असणार कोण!
ढुम ढुम धुमुक्क........ll

उंच घरावर चढुनी वरुनी हुप हुप करतो कोण ?
हा तर आहे माकडदादा दुसरा असणार कोण!
ढुम ढुम ढुमुक्क.......... ll

नदी तिरावर एक पदावर उभा राहतो कोण ?
हा तर आहे ढोंगी बगळा दुसरा असणार कोण !
ढुम ढुम ढुमुक्क............. ll

पाण्याच्या या टाकीमध्ये कीटक खातो कोण ?
हा तर आहे गप्पीमासा दुसरा असणार कोण !
ढुम ढुम ढुमुक्क.................. ll

रोज सकाळी बांग देउनी आम्हास उठवी कोण ?
हा तर आहे कोंबडेदादा दुसरा असणार कोण ?
ढुम ढुम ढुमुक्क ढुम ढुम ढुमुक्क ढुम ढुम ढुमुक्क ढुम ll

कवी -- अनिल शेंडे

*****************************************
( कविता आवडल्यास कवीच्या नावासकट शेअर करू शकता )

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू