पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्त्री

*आई ,बहीण,मैत्रीण ,बायको ,मुलगी ह्यांना समर्पित - "ती"ला समर्पित*


ती एक समर्पण,ती एक शक्ती

जन्म देणारी ती नारायणी,

मरण यातना सोसून ती देते जन्म

तिच्या मुळेच मिळतो आयुष्याला *गर्भित* अर्थ।


घालते ती जखमेवर फुंकर हळूवार,

निराधारांचा ही बनते आधार

ती प्रगती चा ध्यास ,ती ध्येयाची आस,

देते ती पदोपदी जगण्याला विश्वास ।


ती हातात गुंफलेला हाथ

ती देते जन्मो जन्मीची साथ,

सामावते सर्वात दुधातल्या साखरे सारखी

विसरून स्वतःला अशी *अर्धांगिनी* ।


ती एक नाजूक कळी

ती सुगंधित असं फुल,

ती आणते चेहऱ्या वर हसू 

पाहून तिला हरवतात डोळ्यातील आसू ।


ती शालीन, ती सहनशील 

ती प्रेमाचा सागर ,

शांत नि सौम्य अशी ती कामधेनू

तिच्या मुळे आयुष्य जणु इंद्रधनु ।


 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू