पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शब्दबिंदू ( माझे विचार )

माझे नाव धनराज संदेश गमरे . मी एक विद्यार्थी आहे . मी बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे . मी काही कवी किंवा लेखक नाही . मला लहानपणापासून वाचनाची आवड आहे . मी लहान असताना प्रत्येक शालेय स्पर्धेत सहभाग घ्यायचो त्यातून माझी वाचन क्षमता वाढली आणि याचे श्रेय मी माझ्या आईवडील व गुरूंना देऊ इच्छितो .

‘ शब्दबिंदू ’ हे पुस्तक म्हणजे माझे पहिले पाऊल आहे . मला लहानपणी इतर लेखकांची पुस्तके वाचली की मी लेखकाच्या किंवा कवीच्या पुस्तकी विश्वात हरवून जायचो आणि मग मला असे वाटायचे की आपले पण एक पुस्तक असावे ज्यात मी माझे विचार , भावना ओतून सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात . तरी माझे हे स्वप्न साकार करताना मला खूप आनंद होत आहे . या माझ्या छोट्याशा प्रयत्नाला माझ्या मित्रांचे , गुरूंचे , आईवडिलांचे व खूप साऱ्यांचे सहकार्य लाभले . त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून माझ्या हातून हा छोटासा प्रयत्न घडला . तरी मी त्यांचा आभारी आहे . 

धन्यवाद ! 

© धनराज संदेश गमरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू