पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बालक-पालक-शिक्षक

बालक आणि पालक यांची होते गट्टी बट्टी

व्यक्तिमत्त्व जडणघडणीची जमते छान भट्टी

 

पालक बनती बालकांचे पहिले शिक्षक 

शिक्षक बनती बालकांचे दुसरे पालक 

 

शिक्षक पालक मिळून घडवती बालकांना

कुंभार जसा देतो आकार मातीच्या गोळ्यांना

 

संस्कारांचे बीज रुजवती बालकांच्या मनांत

ज्ञान रोपांना योग्य खत-पाणी शिक्षक देतांत

 

मोठे वृक्ष होऊन बालक देतील छाया त्यांस

ह्या सर्वांच्या कष्टाची फळे मिळतील समाजांस

 

कर्तृत्ववान होतील उद्या हे बालक जीवनांत

वाटेल अभिमान पालक, शिक्षकांना अतोनात

 

© राधिका गोडबोले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू