पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सांदिपनी ऋषी


---द्वापर १२६ वर्षे शेष असता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता . कलयुगाचे वर्तमान मध्ये ५११६ वर्षे झाले . या हिशोबाने श्रीकृष्णाचा जन्म ५२४२ वर्षे पूर्व झाला असावा असं मानलं जातं . हाच काळ सांदिपनी ऋषींचा मानला जातो . सांदिपनी ऋषींच्या आश्रमाच्या पूर्ण क्षेत्राला अंकपात असं म्हटलेलं आहे . अर्थात जिथं अभ्यासाला लागणारी पाटी धुतली जाते तो क्षेत्र . या क्षेत्रात एक प्राचीन गोमती कुंड आहे .यात महर्षी सांदिपनी ऋषी रोज स्नान करायचे . याची कथा अशी आहे की त्या काळात हा जो कुंड होता यात रोज स्नान करताना सांदिपनी ऋषी योगविद्येच्या मार्गाने गोमती नदीत ( वर्तमान उत्तर प्रदेश या प्रांतात )जाऊन स्नान करायचे . या प्रक्रियेत बराच वेळ लागायचा .आपल्या गुरूचा वेळ वाचावा म्हणून श्रीकृष्णाने स्वत:च्या चमत्काराने गोमती नदीलाच या कुंडात आणले . भागवत पुराण आणि इतर गुरुकुल कथांमध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे .

- सांदिपनी ऋषी मूळ काशीचे . तपस्या करण्यासाठी ते या महाकाळ वन क्षेत्रात आले . त्यांनी येथे अनेक वर्षे घनघोर तपस्या केली त्या मुळं महादेव त्यांना प्रसन्न झाले . दर्शन झाल्यावर महादेवांनी त्यांना म्हटलं , ' ऋषिवर्य , मी तुमच्या तपस्येने प्रसन्न झालो . वर मागा . ' तेव्हा सांदिपनी ऋषी म्हणाले , ' देवा मला काही नको . अनेक वर्षांपासून या क्षेत्रात पाऊस नाही . क्षेत्र अकालग्रस्त आहे . गोरगरिबांची दुर्दशा होत आहे . त्यांच्या वर कृपा असावी . त्यांची काही सोय व्हावी . या क्षेत्राच्या कल्याणासाठी माझीं आपल्या समोर इतकीच मागणी आहे . ' महादेव ऋषींवर प्रसन्न झाले . म्हणाले , ' ' तथास्तु . ऋषिवर्य , आपण इथचं राहावे. काही काळा नंतर विष्णू अवतार श्रीकृष्ण आपणा जवळ येथे शिक्षणासाठी येतील . '

- या नंतर सांदिपनी ऋषी काशीला परत गेलेच नाही व त्यांनी गुरुकुलाची स्थापना केली . त्यांच्या गुरुकुल मध्ये शास्त्रोक्त रित्या १४ विद्या व ६४ कला यांचे शिक्षण दिले जात असे . भागवत पुराणात १४ विद्या व ६४ कलांचे स्पष्ट विवरण आहे .

- सांदिपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण व सुदामाच्या मैत्रीच्या कथा आपण वाचलेल्या आहेत . त्या काळातही विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर प्रशिक्षण , राहण्या बरोबरच जेवण्याचीही सोय असायची . एकाच जागी सर्व सोय असल्याने आणि गुरूच्या सतत सान्निध्यात असल्याने या व्यवस्थेला ' गुरुकुल ' चे नाव दिले जात असे आणि गुरुकुलची व्यवस्था करणाऱ्याला आणि विद्या प्रदान करणाऱ्याला गुरु बरोबरच ' कुलपति ' चे संबोधनही दिले जात होते .

- सांदिपनी ऋषींची विशिष्टता व महत्ता थोडक्यात सांगायची असेल तर ते नितीमत्ता श्रेष्ठ योगीराज श्रीकृष्णाचे गुरु होते . महाभारतात श्रीकृष्णाचे जे कौशल्य बघायला मिळाले त्याचे बाळकडू नक्कीच सांदिपनी ऋषींनीच दिलेले असावे . महत्वाचं म्हणजे , श्रीकृष्णाने ' श्रीमद भागवतगीते ' च्या माध्यमाने नीतिशास्त्राचे संपूर्ण जगाला जे अजराअमर तत्वज्ञान दिलेले आहे त्याची उर्जा नक्कीच सांदिपनी ऋषींचे कौशल्यच म्हणावे लागेल .

----------------------------------------------

१४ विद्या ६४ कला या बद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते . त्या १४ विद्या आणि ६४ कलांची माहिती खालील प्रमाणे आहे .

---------------------------------------------

- १४ विद्या !!

-----------------

- चार वेद सहा वेदांगे न्याय मीमांसा पुराणं धर्मशास्त्र = १४

----------------------------------------------

- चार वेद :- ऋग्वेद - यजुर्वेद - सामवेद - अथर्ववेद .

- सहावेदांगे :-

-------------

- व्याकरण :- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र .

- ज्योतिष :- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या .

- निरुक्त :- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र .

- कल्प :- धार्मिक विधी-व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र .

- छंद :- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्तीचे ज्ञान .

- शिक्षा :- शिक्षण , अध्यापन आणि अध्ययन .
---------------------------------------------

- ६४ कला !!!

----------------------

-( ०१) पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे . - (०२) धातुवद- कच्ची धातु पक्की व मिश्र धातु वेगळी करणे . - (०३) दुर्वाच योग - कठीण शब्दांचा अर्थ लावणे . (०४)आकार ज्ञान - खाणीविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे .- (०५) वृक्षायुर्वेद योग - उपवन , कुंज, वाटिका , उद्यान बनविणे .- (०६) पट्टिका वेत्रवाणकल्प - नवार , सुंभ , वेत इत्यादींनी खाट विणणे .- (०७) वैनायीकी विद्याज्ञान - शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे . (०८ ) व्यायामिकी विद्याज्ञान - व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे .- (०९) वैजापिकी विद्याज्ञान -दुसऱ्यावर विजय मिळविणे .- (१० ) शुकसारिका प्रलापन - पक्ष्यांची बोली जाणणे .- (११) अभिधान कोष छंदोज्ञान - शब्द व छंद यांचे ज्ञान असणे . (१२ ) वास्तु विद्या - महाल , भवन , राजवाडे , सदन बांधणे . - (१३ ) बालक्रीडाक्रम - लहान मुलांचे मनोरंजन करणे .- ( १४ ) चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया - पाकक्रिया , स्वयंपाक करणे . - (१५ ) पुस्तकवाचन - काव्य गद्यादी पुस्तकं व ग्रंथ वाचणं . - (१६ ) आकर्षण क्रीडा - दुसऱ्याला आकर्षित करणे . - ( १७ ) कौचुमार योग - कुरूप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे .- ( १८ ) हस्तलाघव - हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामं करणं . - (१९ ) प्रहेलिका - कोटी , उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे .- ( २० ) प्रतिमाला - अत्यांक्षराची योग्यता ठेवणे . - (२१ ) काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे . - (२२ ) - भाषाज्ञान - देशी - विदेशी बोलींचे ज्ञान असणे . - ( २३ ) चित्र योग - चित्रे काढून रंगविणे . - ( २४ ) कायाकल्प - वृध्द व्यक्तीला तरुण करणे . - (२५ ) माल्याग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे . - ( २६ ) गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे . - ( २७ ) यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे . - ( २८ ) अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे .- ( २९ ) संपाठ्य - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे . - ( ३० ) धारण मातृका - स्मरण शक्ती वृद्धिंगत करणे . - ( ३१ ) छलीक योग - चलाखी करून हातोहात फसविणे . - ( ३२ ) वस्त्रगोपन - फाटकी वस्त्रे शिवणे . - ( ३३ ) मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे . - ( ३४ ) द्यूतक्रीडा - जुगार खेळणे .- ( ३५ ) पुष्पकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे .- ( ३६ ) माल्यग्रथन - वेण्या , पुष्पमाला , हार गजरे बनविणे . - ( ३७ ) मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे .- ( ३८ ) मेषकुक्कुटलावक- युध्द विधी- बोकड ,कोंबडा इत्यादिच्या झुंजी लावणे . - ( ३९ ) विशेषकच्छेदज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकाचे साचे बनविणे . - ( ४० ) क्रिया विकल्प -वस्तूच्या क्रियेच्या प्रभाव उलटविणे . - ( ४१ ) मानसी काव्य क्रिया - शीघ्र कवित्व करणे .- (४२ ) आभूषण भोजन - सोन्या चांदीने व रत्नामोत्यांनी काया सजविणे .- (४३ ) केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुलं माळणे . - ( ४४ ) नृत्यज्ञान - नृत्या विषयाचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे . - ( ४५ ) गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे . - (४६ ) तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे . - (४७ ) केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालिश करणे .- ( ४८ ) उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे . - ( ४९ ) कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे . - (५० ) नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे . - (५१ ) उदकघात - जलविहार करणे , रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे .- ( ५२ ) उदकवाद्य - जलतरंग वाजविणे .- ( ५३) शयनरचना - मंचक , शय्या , व मंदिर सजविणे .- ( ५४ ) चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रं काढणे . - (५५ ) पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे . - ( ५६ ) नाट्य अख्यायिका दर्शन - नाटकात अभिनय करणे .- ( ५७ ) दशनवसनांगरात - दात , वस्त्रे , काया रंगविणे वा सजविणे . - ( ५८ ) तुर्ककर्म - चरखा व टकळीने सुत काढणे . - ( ५९ ) इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे . - ( ६० ) तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे . - ( ६१ ) अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे .- ( ६२ ) सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे .- ( ६३ ) म्लेंच्छीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे . - ( (६४ ) रत्नरौप्य परीक्षा -- अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे .
--------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर, इंदूर.
-----------
- मो. - ९१- ९८९३१२५२४७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू