पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हा दाह विरहाचा

हे दुःख जिवनाचे

सांगु कसे कुणाला

हा दाह विरहाचा

 कळेल कसा कुणाला ? ॥ ध्रु ॥


साक्षीस चंद्र होता 

आकाशी पौर्णिमेच्या

जाण आपल्या प्रितीची

होती, तारकाना नभिच्या

दरवळ प्रेमाचा , अजुनही

जपलाय बागेतल्या फुलानी

मात्र अधुरीच कां रहावी

कथा प्रेमाची तुझ्या नि माझ्या .....


हे दुःख जिवनाचे

सांगु कसे कुणाला

हा दाह विरहाचा

 कळेल कसा कुणाला ? ॥ ध्रु ॥


ओघ आठवणींचा

ना थांबे क्षणभरासही

 स्वप्ने सुखद  तेव्हाची , 

आज , हृदयी टोचताती

ते गित श्रावणसरीतले

झर अखंड आज नयनी

बहरून होता बगिचा

का विराण माळ व्हावा .....


हे दुःख जिवनाचे

सांगु कसे कुणाला

हा दाह विरहाचा

 कळेल कसा कुणाला ? ॥ ध्रु ॥


                    ..... प्रदिप राजे

                           रोहा - पुणे

                    ११ /o९ / २०२२

                         संध्या ६.३० वा.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू