पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भ्रमनिरास मृगजळ

कितीही राखून ठेवा अंतर, परस्परांपासून भिन्नता पण, समाजात कुठल्या ना कुठल्या संकराने बाटल्यासारखे वाटू लागते...


सगळं व्यवस्थित असताना, कोणतीही चूक नसताना, आपल्याच कर्माची शीडी ,आपल्याला मोठ्या गुन्हा असल्यासारखी वाटू लागते...


स्वछंद, आकाशात मनमुराद ,घीरट्या घालत असताना अचानक ,कोसळतो जमिनीवर जसे की, अचानक कोणीतरी पंख छाटल्यासारखे वाटू लागते...


जीवापाड प्रेम करणाऱ्याला परके होतो, एकाएकी दुरावले जातो तेव्हा, डोळ्यात पाणी आल्यासारखे अन् घशातील कंठ दाटल्यासारखे वाटू लागते...


 तहानेने व्याकुळ झालेले हरणाचे पाडस ,सततची निराशा पदरी पडल्याने ,पाण्याच्या शोधात एवढे भ्रमनिरास होऊन जाते की ,समोर खरोखर जरी  तलाव, सरोवर पाण्याने परिपूर्ण भरलेले दिसत असले तरी त्याला सुरुवातीला ते एक मृगजळ असल्यासारखे वाटू लागते...


कितीही ब्रँडेड कापड,वस्तू,पदार्थ असूद्या , कुठ पर्यंत करणार त्याची नवलाई, शेवटी विट हा येतोच अन् कालांतराने एक दिवस तेही ,जीर्ण, नीरस झाल्यासारखे वाटू लागते...


शून्याच्या खाली जातो जेव्हा,आनंदाचा पारा, पाणी तर सोडा तेव्हा सळसळते गरम रक्तही गोठू लागते...


राजकारणात जेव्हा नवनवीन बदल घडवू लागते, एकमेकांच्या स्वार्थासाठी हेच भिडवतात त्यांना, नाही तर काय जनता मूर्ख आहे,कुठेही, केव्हाही आपापसात लढू लागते...


अडविला जातो सत्याचा प्रवाह, वेगवेगळ्या मार्गाने खंडित करून, चालने मुश्किल होऊन जाते समाजातील सुगंधाच्या दर्वळाने, जेव्हा डबक्यात पाणी सडू लागते...


परराष्ट्रांच्या नजरेत भरतात, जेव्हा विकसित राष्ट्र चिकाटीने इतिहास घडवू लागते अन् मग एक मेकांना शह , मात देण्यासाठी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष कटकारस्थाने घडू लागते...


सुरु होतो विध्वंस ,समाजात पसरते अराजकता , हाहाकार , गोंधळ,अत्याचार मग जगतश्रेष्ठीचीही सत्ता डगमगू लागते...


नको पोखरू माझी डोंगर रुपी काया,

कशाला तोडून करताय उजाड, घनदाट वृक्षांची छाया...

खरच करत असेल का? निसर्ग , नर अधमांपुढे अस्तित्व रक्षणासाठी विनंती विनवण्या....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू