पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझं गाव

छोटसं आणि एक सर्वसाधारण गाव आहे माझं, स्वतःच्या माझ्या नावावर सांगण्यासारखं विशेष असं काहीच नाही माझं पण हो छोटसं आणि एक सर्वसाधारण गाव आहे माझं...


गावातील शाळेच्या दाखल्यावर, सतत हजर असल्याचं नाव आहे माझं हो, छोटसं पण एक सर्वसाधारण गाव आहे माझं...


आई करते स्वयंपाक, वडील करतात शेती, भाऊ जातो बाहेर कामाला त्याला वहिनी साथ देती,

 बहिणी त्यांच्या सुखात आहे, चुलते काके ही मजेत,

 विभाजनाला कारण लागत नाही,

संकट हे किती छोटस असलं तरीही गावातील सर्व कुटुंब मात्र त्यावेळी गोळा झाल्याशिवाय राहत नाही...


चमचमीत अन् आरश्यासारख्या  स्पष्ट दिसणाऱ्या इमारती असायला हे काही मोठं शहर ,नगर नाही,

इथली माणसं गावंढळ ,खुळचट ,अडाणी असली तरी प्रेमळ, मनमिळावू आणि थोडीशी स्वार्थांध, भांडकुदळ आहेत, पण तरीही छोटसं अन् सुंदर दिसणार हे माझंच गाव आहे...


आश्वासन नाही पण , शब्द देतो, एकदा आलात ना

परत माघारी जावं ,असं वाटणार नाही,

कधी हरवून बसलो स्वतःला आपण हे स्वतःलाच समजणार नाही...


तीच दिसत असली दगड आणि माती तरीपण, गंध हा वेगळा दरवळल्याशिवाय राहणार नाही,

नवख वाटेल थोडसं सुरुवातीला पण परक मात्र अजिबात वाटणार नाही ....






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू