पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परीराणी

परी राणी(बाल कविता)


चिऊताई हसली,"भुर्रकन" उडली
लाल लाल फुलांच्या फांदीवर जाऊन बसली  
तिला म्हटले,"मी येऊ का?,
वाटीत थोडस पाणी देऊ का?"
आत पळाले पटकन
पाणी सांडल, वाटी हातात, पाय घसरला झटकन...
धपकन धपाटा- डोळ्यात आल पाणी
बाबांनी जवळ घेतलं ओळखून आणीबाणी  
दुपार झाली, रंगात आले होते कार्टून नेटवर्क 
इतक्यात आतून ओरडा झाला "पुरा झाला का होमवर्क?"
हिरमुसल्या मनाने पटकन उठले
अभ्यासाच्या गर्दीत जाऊन बसले...
स्पेलिंग चुकली चार , गणित चुकली आठ...
आता मात्र खैर नाही, आईशी आहे गाठ...
रात्र झाली,  पापण्यांवर आला भार,
जेवतांना भाजी खा , नाहीतर पडेल मार...
जेवण झालं , मुकाट्याने उठले,गादीवर जाऊन पडले
कपाळावर आला प्रेमळ हात, कानावर आली गोड वाणी,
दमलीस का ग माझी राणी...?
जडावलेल्या डोळ्यांनी हळूच पहिले,
मग खुदकन गालात हसले
जरासे डोळे मिटले आणि जाणवले की,
हीच तर स्वप्नात येऊ पहाणारी
खरी खरी परीराणी   
परीराणीने प्रेमाचे पंख पसरले
आणि मी तिच्या कुशीत हळूच सरकले...


सुषमा ठाकूर , भोपाळ 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू