पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आई कधी येणार

बालगीत
आजी, सांग ना ग कधी येणार आई
तिला भेटायची मला झाली घाई
शाळेत मिळालेलं बक्षीस कधी तिला दाखवू?
माझ्यासाठी कितीतरी आणेल ना ती खाऊ?

रोजच मी लवकर येतो
वाट तिची पाहात बसतो
कधीतरी ती का नाही येत माझ्या आधी
ऑफिसला मारत का नाही दांडी कधीमधी?

आजी, तू तरी आहेस म्हणून किती छान झालं
मित्राच्याच्या घरचं कुलूप त्यानंच आज काढलं
आजी, तुझी नी माझी जमलीय गट्टी
माझ्यासाठी तू करतेस कितीतरी खटपटी

आजी, नाही ग रागवत आईवर
माया करतो तिच्यावर
बाबां आणि आई काम करतात दिवसभर
लाड माझे करतात काम करून आल्यावर

आली माझी आई, भरकन गाडीवरून
आता पटकन जवळ घेईल मला ओढून
आई आली की घर कसं भरतं
तिच्या मिठीत खूप छान वाटतं.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू