पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भेगा

तुटलेल्या मनाला स्वतः च सावरावे,
पायी पडलेल्या भेगांना स्वतःच बुजवावे,
न येई कुणी पुसाया अश्रू तुझे,
वाट कुणाची न पाहता स्वतःच स्वतःला हासवावे,

मांडू नकोस अंतरीचे दुःख ह्या बाजारी,
नेईल ही दुनिया त्याला हसण्यावारी,
बदलण्या जाशील दुनियेला जरी
बसतील चटके तुझ्याच पायी,
नको ठेवू आशा जग बदलण्याची,
बदल स्वतःलाच ठेवून मौन आणि घालून हाताची घडी.

©- मोनिका बासरकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू