पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बालगीत

बाल गीते १ :

  चला गड्यांनो भेटू या!

  आपण सारे खेळूं या !! धृ!!

  गिलली दंडा लगुरजी खेळू या !

भोवरा गोटयांची लूट करु या !१!

लपाछपी चा खेळ खेळूया!

मध्ये च बर्फाचा गोळा खाऊ या!२!

चणे दाणे खिशात भरू या !

हसत खेळत फस्त करु या ! ३!

क्रिकेट चा आहे जमाना !

फोर सिक्स मारुन करु ठणाणा !४! धृ


बाल गीते २ :

गड गड धड धड नगारा वाजे निल नभाच्या

 अंगणी !

काळे काळे मेघ जमुनी

वर्षती भू मातेच्या प्रांगणी !

खळ खळ स्वरे नद्या वाहती

नावा कागदी बघा विहरती !

हिर व्या रंगे सृष्टी बहरली

वृक्ष वल्लीने फुले उधळली!

चला मुलांनो निसर्ग जपुया वृक्षा रोपुनी जतन

करु या !

हिरव्या रंगे उत्साहीत राहुनी हसत खेळत राहू जीवनी !!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू