पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मोबाईल

विडंबन काव्य


कवी भा.रा. तांबे यांची क्षमा मागून… 'ते दूध तुझ्या त्या घटातले

का अधिक गोड लागे नकळे'


या गीताच्या चालीवर केलेला प्रयत्न…


      मोबाईल 


तो मोबाईल सतत कानाला 

जणू सहावं बोट फुटे हाताला (धृ.)


निद्रादेवी मग रजा घेतसे 

मोबाईलचे किती लागले पिसे

प्रभाते मनी मोबाईल दिसे

घेती 'कराग्रे वसती' म्हणायला (१)


कानामध्ये वायरी घालती

अज्जिबात ध्वनी ऐकू न येती

समोरच्याला धडकही देती

त्यांचं 'डोळे फुटलेत का' ऐकायला (२)


अभ्यास-कामं काही सुचेना 

मोबाईलविना गेम/स्वैपाक होईना

कळतंय परी मुळीच वळेना

जरी ढापणं लागती डोळ्याला (३)


मोबाईल नच वैरी दुसरा 

भांडणं, धुसफूस नांदती घरा

देती दुषणं सदा परस्परा 

परि वेळ नसे मृदू बोलायला (४)


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू