पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बालविश्व

"बालविश्व"


खेळासाठी जमते गट्टी

राग येता होते कट्टी


थोडी मस्ती थोडा खेळ

मुलांचा मग जमतो मेळ.


अभ्यासाचा पडतो ताण

खेळता खेळता हरवते भान.


आईला राग येतो फार

बाबांचा मग बसतो मार.


चॉकलेटसाठी लाडीगोडी

उगीचं काढतो आईची खोडी.


चॉकलेट खाऊन धूम पळतो

अभ्यास म्हणता खूप रडतो.


©® विशाल कन्हेरकर.

 मु.पो.निंभा.ता.भातकुली.

 जि.अमरावती.444602

 मो.9172298839.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू