पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चल खेळू

ए चल रे बाळू आपण खेळू,
  दाराशी वाळू चा ढीग आहे ना,
त्या  वर गडाबडा लोळू.
ए चल रे पिंटू  आपण खेळू,
 त्या  बागेतील  खड्ड्यात पाणी 
साचले आहे ना  
त्यात छपाक  छपाक करू.
ए चल रे डंपू आपण खेळू,
 त्या  समोरच्या  घराच्या अंगणात 
 पेरू चे  झाड आहे ना,
त्या  वर चढू आणि पेरू तोडू.
ए चल  रे पप्पू  आपण खेळू,
रस्त्यावर धावू आणि शिवाशिवी खेळू,  एकदुसरयाला धरू.
अरे नको आई रागवेल,
केसात वाळू जाईल म्हणेल, 
चिखलात कपडे ओले होतील,
नका जाऊ म्हणेल, 
झाडा वरून पडाल, लागेल
असं पण म्हणेल, 
बाबा रागवतील, रस्त्यावर  धावू नका,
गाडया  जात आहेत, लागेल म्हणतील. 
अरे नाही रागावणार,
ते पण तर लहानपणी असंच खेळत होते,
सांगत होते ना
अरे चल, रागवतील म्हणून
खेळायचं नाही का,
आम्हाला  आवडेल ते काहीच
करायचं नाही का?
सांग आई ,सांगा बाबा.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू