पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आसुसलेल्या बाळाचे गाणे

नको पोकेमोन नको डोरेमॉन

आई तू  आज  सुट्टी घे छान



नको पिझ्झा नको बर्गर 

तुझ्या हातचं जेवण दे

मी खाईन चटणी भाकर



नको व्हिडिओ गेम

 नको रिमोट कार

 घे मला तुझ्या कुशीत 

झोपू दे तास चार 


 इतर मुलांसारखे  गिफ्ट 

मी नाही मागत

झोप उडवून दोन् शिफ्ट

अभ्यास करीन जागत


रोजच तुम्ही उपस्तात

कामाचा महापूर

तू,मी आणि बाबा

जाऊ दूर भुर्र 


सगळ तुमचं ऐकिन

शिस्तीत राहीन सारखं

आज तुझ्या प्रेमाला

नको करू पारखं


मस्ती मुळीच करणारं नाही 

ठेवीन मोठ्यांचा मान

आई तू आज सुट्टी घे छान





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू