पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उपहार

आज विलियम खूपच आनंदात होता. वेदांत ने त्याला कारण विचारले तर म्हणाला आज पासून माझ्या घरी क्रिसमस ची तयारी सुरू झाली आहे, आमचा खूप मोठा सण असतो हा.असं का ?काय असतं ह्यात ? वेदांत ने विचारल्यावर तो उत्साहाने म्हणाला तू उद्या ये न माझ्या घरी आपण मिळुन माझा रूम डेकोरेट करू आणि तुला आवडलं तर घरा बाहेर चा पैसेज पण डेकोरेट करू त्यावेळी मी तुला सर्व सांगतो. दुसऱ्या दिवशी अत्यंत उत्सुकता घेऊन च वेदांत विलियम कडे गेला.सर्व सजावट करता करता विलियम ने येशूच्या जन्माची कथा थोडक्यात सांगितली आणि अति आनंदाने उड्या मारत म्हणाला सर्वात जास्त छान म्हणजे त्या रात्री सांता क्लाज येऊन लहान मुलांच्या उशाशी त्यांनी मागितलेली वस्तू ठेऊन जातात आणि टाळ्या वाजवत म्हणाला मला पण माझी आवडती वस्तू नक्की मिळणार.हो का ?  वेदांत ने विचारले आणि फक्त क्रिसमस ला च तुला उपहार मिळतात ? तर विलियम ने ठाम पणे होकार देत त्याला विचारले तुमच्यात असा एक ही सण नाही न ? तेव्हा वेदांत ने हसून सांगितले अरे तुझ्या कडे फक्त एकच सणाला सांता क्लाज येतो आमच्या कडे तर वर्षभर दर वेळी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे उपहार आम्हाला आमचे सांता देऊन जातात.आश्चर्याने विलियम ने विचारले सांग बर कोण ? तेंव्हा वेदांत ने सांगायला सुरुवात केली बघ सर्वात आधी गणपती बाप्पा येतात ते आम्हाला एकच नाही चांगले दहा दिवस बुद्धी चा उपहार देतात,मग आमचे पितर म्हणजे पूर्वज सुख-समाधानाचा आशीर्वाद देतात,मग नवरात्रात देवी आई शौर्य आणि धाडस देते,मग दिवाळी त महालक्ष्मी ऐश्वर्य घेऊन येते,आणि वसंतपंचमी ला सरस्वती विद्येचे दान देते,रामनवमीला राम संयम आणि माणुसकी शिकवतात,हनुमान जयंती ला मारुती राय बल, बुद्धी, भक्ती देऊन जातात बाकी खेळणे, वस्तू हे तर माझे आई बाबा च वेळोवेळी मला घेऊन देतात .हे सर्व ऐकुन विलियम थोडा हिरमुसला पण लगेच निरागसपणे आंनदी होऊन दोघेही तयारीला लागले.

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू