पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवस संपल्यावर आई

जर मी पक्षी असतो आई

घेऊन ऊंच भरारी मी

ढगांवर जाऊन येईन

 

जर मी होणार ससा आई

हिरव्यागार गवतावर

पळून येईन

 

जर मी झालो कधी हनुमंत

तर चंद्राची भेट

घेऊन येईन

 

जर मी झालो कधी सुंदर विमान

वाऱ्याबरोबर शर्यत

जिंकून येईन

 

दिवस संपल्यावर आई

आता काही पराक्रम नाही

मी तुझ्या कुशीत येऊन जाईन

मी आनंदाने निजून जाईन

 

सौ. मीनल आनंद विद्वांस

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू