पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वाटा उचलू खारीचा

(१)वाटा उचलू खारीचा


खारुताई खारुताई 

किती आहेस चपळ 

तुझं आपलं सारखं 

इथं पळ, तिथं पळ   (१)


ऐटदार शेपटीचा 

गोंडा फुलवते भारी 

जरा चाहूल लागता 

जाते पळून स्वारी    (२)

 

लुकलुक करी डोळे 

दिसतात जसे मणी 

गोष्ट तुझी ऐकलीय 

सर्वांनीच बालपणी   (३)


रामसेतू बांधायला 

म्हणे मदत केलीस 

वानरांना थोडी थोडी 

वाळू आणून दिलीस (४)


राम झाला प्रसन्न 

हात ठेवला पाठीवर 

खुण त्याचीच म्हणून 

पट्टे तुझ्या अंगावर    (५)


जर हवा एखाद्याला 

हात कधी मदतीचा 

म्हणतात सारेजण

वाटा उचलू खारीचा  (६)


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू