पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कोण होऊ बरं?

(२) कोण होऊ बरं?


आई गं! मी होऊ का

मोठ्ठा सुपरमॅन? 

व्यायामाने माझं शरीर 

बनविण पिळदार छान     (१)


नाही तर मी होऊ का 

सर्व शक्तीमान? 

दूध पिऊन होईन 

खूप खूप ताकदवान      ‌  (२)


छोटा भीम होऊ का? 

मोठ्ठी कामं करीन 

त्याच्यासारखं होण्यासाठी 

फळं, पालेभाज्या खाईन  (३)


तब्येत ठेवीन छान, तरी 

नको पराक्रम खोटा 

गंमत म्हणून पाहीन

पण होईन कोणी मोठा    (४)


मोठं म्हणजे कोण बरं?

काही सुचत नाही

हं..! आपल्या देशासाठीच

करावं म्हणतो काही        (५)


म्हणूनच मी होईन आई!

सीमेवर शूर जवान

रक्षण करीन देशाचं 

तुला वाटेल अभिमान     ‌ (६)


भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

9763204334

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू